जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडलवार यांच्या हस्ते छल्लेवाडा येथील जि.प.शाळेतील नवीन वर्ग खोलीचे भूमिपूजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी :
अहेरी पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय रेपनपली अंतर्गत येत असलेल्या सर्वात मोठे गाव छल्लेवाडा या  ठिकाणी  जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा असून  इयत्ता १ ते ८ वी पर्यंत शिक्षण असून २०० च्या जवळपास विध्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र गेल्या अनेक वर्षापासून वर्ग खोलीच्या कमतरता असून याकडे दुर्लक्ष केल्या जात होती. जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडलवार व रेपनपली उमानूर क्षेत्राचे जि.प.सदस्य अजय नैताम, व प.स.सदस्य भास्कर तलांडे यांनी गेल्या महिन्यात छल्लेवाडा गावाला भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली,त्यावेळी शाळा व्यवस्थापण समिती व पालकांनी जि.प.उपाध्यक्षकडे नवीन वर्ग खोलीची मागणी केली व गावातील सर्वांकडून वर्गणी गोळा करून नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी जागा घेणार असल्याची माहिती दिली होती,त्याचक्षणी जि.प.उपाध्यक्ष व शाळा व्यवस्थापण समितिचे पदाधिकाऱ्यांनी सदर जागेची पाहणी केली.  जागा सोईस्कर असल्याने जि.प.उपाध्यक्ष यांनी शा.व्य.स.व गावकऱ्यांना शब्द दिला कि तुम्ही जागा निश्चित करा मी जिल्हा परिषदेच्या कोणत्याही निधीतून शाळेच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करू देऊ.  त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आली असून लवकरच नवीन इमारत विध्यार्थाच्या शिक्षणासाठी उपलब्ध होईल असे दिलेले शब्द पूर्ण केले.
आज सदर वर्ग खोलीचे भूमिपूजनाच्या कार्यक्रम सम्पन्न झाले असून सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य अजय नैताम होते, तर उदघाटन म्हणून जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडलवार होते यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख सुनील आईचवार, गट समन्वयक प.स.अहेरीचे बूर्से, मुख्याध्यापक येलमुले सह शिक्षक मुरमाडे ,ग्राम पंचायत सदस्य सीताराम मडावी, शा.व्य.स.अध्यक्ष वसंत चव्हाण होते.
या भूमिपूजन कार्यक्रमाला वसंत गुरुनूले,व्येँकटस्वामी ठाकरे,नारायण कोटरंगे, नागेश गुरुनूले हनुमंतू ठाकरे, प्रकाश सभावट, सेवा चव्हाण, तिरुपती धरबत,विलास सभावट,रणजीत सभावट,रामचंद्र झाडे, जगनाथ दुर्गे, रामचंद्र रामटेके, प्रवीण भगत, व्येंकटी दहागावकरसुधाकर दुर्गे, वैकुटम आकुदर, राजेश ठाकरे, रामकृष्ण लेंनगुरे, राजू लेंनगुरे, संतोष निकूरे व्येंकटी पोरतेट, श्रीनिवास लेंनगुरे, आदि उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-23


Related Photos