जिल्हधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भामरागड तालुक्यात विविध ठिकाणी आकस्मिक भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यातील विविध ठिकाणी   जिल्हाधिकारी शेखर सिंह व मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या.  विविध समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.  तसेच विविध कामांचे उद्घाटन , लोकार्पण केले.
 २२ जूनला सकाळी ९ वाजता शेखर सिंह व डॉ. विजय राठोड यांनी मल्लमपोडूर येथील बँक आँफ महाराष्ट्र व प्रधानमंत्री (PMGSY)या योजनेअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या कोठारे राईस मिलचे उद्घाटन केले. तद्नंतर लाहेरी गावाला भेट देवून नागरिकांशी संवाद साधून विविध समस्या जाणून घेत समस्यांचे निराकरण करण्यांची हमी दिली.येथील आरोग्य वर्धिणी केंद्राला भेट देत माहिती जाणून घेतली. अतिदुर्गम होडरी येथील जि.प.शाळेत विद्यार्थी संख्या जास्त आहे;मात्र वर्गखोली कमी त्यामुळे पावसाळा संपताच पुरेशा वर्गखोल्या बांधून देण्याचे आश्वासन दिले.भामरागड येथील माँडेल स्कूलच्या नवनिर्मित ईमारतीचे उद्घाटन केले.आरेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्यासंबंधी समस्या जाणून घेतल्या.भामरागड येथील देवराई आर्ट व्हिलेजला भेट दिली.ग्रामीण रुग्णालय भामरागड येथील माँडेल प्रसुतीग्रुहाचे लोकार्पण केले.त्यानंतर महसूल विभागाचे कर्मचारी व नगरपंचायत कर्मचारी व पदाधिकारी यांची संयुक्त आढावा बैठक घेतली. प्रधानमंत्री किसान योजना वनहक्क पट्ट्यातील दावे त्वरीत निकाली काढण्याचे निर्देश दिले. विविध विकासात्मक बाबीवर सखोल चर्चा केली.त्यानंतर ताडगाव येथील बँक आँफ महाराष्ट्र च्या मिनी ब्रँचचे उद्घाटन केले.तसेच विर बाबूराव शेडमाके जात प्रमापत्राचे वितरण जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील,संवर्ग विकास अधिकारी महेश ढोके,एकात्मिक बालविकास अधिकारी बडे, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, नायब तहसीलदार निखिल सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद मेश्राम,पं.स. सभापती सुखराम मडावी,नगराध्यक्ष सौ.संगिता गाडगे इत्यादी अधिकारी- पदाधिकारी उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-22


Related Photos