महत्वाच्या बातम्या

 प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांचे निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : नोबेल पुरस्काराने सन्मानित असलेले प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांचं निधन झालं आहे. ते ८९ वर्षांचे होते. १९९८ साली त्यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. अर्थशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले हिंदुस्थानी होते. त्यांच्या पश्चात मुलगी अभिनेत्री नंदना सेन असा परिवार आहे.

सेन यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३३ साली झाला. त्याचे संपूर्ण बालपण विश्वभारती कॅम्पसमध्ये केले. प्रसिद्ध संस्कृतज्ञ क्षिती सेन या त्यांच्या आजी होत्या. रविंद्रनाथ टागोर यांनी डॉ. अमर्त्य सेन यांचे नाव ठेवल्याचे बोलले जाते. त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी पुढील शिक्षण घेतले. त्यांनी केंब्रिज विद्यापीठात पीएचडी पूर्ण केली. ते हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत होते. तर हिंदुस्थानात ते जादवपूर विद्यापीठ, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षणसंस्थांमध्येही त्यांनी काही काळ अध्यापन केले.





  Print






News - Rajy




Related Photos