झिंगानूर - सिरोंचा बस उलटली, जिवितहाणी टळली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
झिंगानूर येथून सिरोंचाकडे जात असलेली बस झिंगानूरपासून १५  किमी अंतरावर एका नाल्यावरील छोट्या पुलावरून उलटल्याची घटना काल २१ जून रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवितहाणी झाली नसून काही प्रवाशांना किरकोळ इजा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
एमएच ०७ सी - ९४१३ क्रमांकाची बस झिंगानूर येथून सिरोंचाकडे जात होती. बसमध्ये काही प्रवासी होते. झिंगानूरपासून १२ ते १५ किमी अंतरावर आल्यानंतर बस उलटली. यावेळी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. काही प्रवाशांना किरकोळ ईजा झाली. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-22


Related Photos