ठाणेगावातील हेमांडपंथी मंदिर मोजत आहे अखेरची घटका


- पुरातत्व विभागाचे दूर्लक्ष, प्राचिन वस्तू नामशेष होण्याच्या मार्गावर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मिथून धोडरे / आरमोरी :
तालुक्यातील ठाणेगाव येथील हेमांडपंथी मंदिर पुरातत्व विभागाच्या दूर्लक्षामुळे अखेरच्या घटका मोजत असून इतिहासाची साक्ष देणारी प्राचिन वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. प्राचिन हेमांडपंथी मंदिराचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मंदिराच्या दुरूस्तीकडे लक्ष देण्याची मागणी भाविकांकडून केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. जिल्ह्याला प्राचिन संस्कृतीचा वारसा लाभला आहे. हे पुरातन हेमांडपंथी मंदिर व किल्ल्यांना बघून लक्षात येते.  ठाणेगाव येथील जुन्या वस्तीजवळ असलेले पुरातन व हेमांडपंथी मंदिराला भेगा पडलेल्या आहेत. पायऱ्यांचे  दगड निघाले आहेत. वाळवी लागलेली आहे.  मातीचे वारूळ तयार झालेले आहेत. यामुळे मंदिराची दयनिय अवस्था झाली आहे. मंदिराच्या सभोवताल भिंत टाकण्यासाठी सबंधित विभागाने दगड व लोखंडी साहित्य आणले आहेत. मात्र काम सुरूच करण्यात आले नाही. 
हेमांडपंथी मंदिर गावाबाहेर असलेल्या टाकी या बोडीच्या काठावर वसले आहे. या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते. मात्र सध्यास्थितीत मंदिराचे सौंदर्य कमी होत आहे. मंदिराच्या दुरूस्तीकडे लोकप्रतिनिधी तसेच पुरातत्व विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-22


Related Photos