जाळपोळ करून वनसंपत्ती नष्ट करणाऱ्या वनकर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करा


- विविध संघटनांचा आंदोलनाचा इशारा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी : तलवाडा येथील राखीव जंगल परिसरात नियमबाह्यरित्या सागवान वृक्षांची तोड करून उपयुक्त आणि दर्जेदार प्रतिचा सागवान लाकूड जाळपोळ करण्यात आल्याचा प्रकार स्थानिक जनता व पेसा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला आहे. यामुळे सबंधित वनकर्मचारी व अधिकाऱ्यांवर  कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विविध संस्था आणि संघटनांनी दिला आहे.
आलापल्लीच्या उपवनसंरक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २० जून रोजी दुपारच्या सुमारास तलवाडा येथील राखीव जंगलात जाळपोळ करण्यात आल्याचे निदर्शनास आले. स्थानिक नागरीकांनी याबाबत विचारणा केली असता वनविभागाचे नियम व कायदे तुम्हाला माहित आहेत काय?, तुम्हाला तक्रार करायची असल्यास करा, मला काहीही फरक पडत नाही, असे उत्तर सबंधित कर्मचाऱ्याने देउन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही अशाच प्रकारे लाकूड स्वयंपाकासाठी घेवून जात असताना वनविभाग हे लाकुड टाकाउ नाही असे म्हणून कारवाई करीत होते. मात्र आता स्वतःच जाळपोळ करीत आहे. उत्तम दर्जाचे लाकूड जाळण्यात येत आहे.
भारतीय वनकायदा १९२७ नुसार उपयुक्त व उत्तम दर्जाचे सागवान लागूड जाळण्याची तरतूद आहे काय, असल्यास वनविभागाने खुलासा द्यावा, वन ही राष्टीय संपत्ती आहे. तिचे रक्षण करण्याऐवजी रक्षकच भक्षक बनत आहेत. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
तलवाडा येथील राखीव जंगल परिसरात जवळपास ३५ ते ४० एकर जंगलातील नियमबाह्य सागवन वृक्षतोड करून उत्कृष्ट आणि दर्जेदार लाकूड जाळण्यामागे कासरण काय, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गाव ग्रामसभा समिती आलापल्ली, जागृत युवा मंच अहेरी, युवा विकास संस्था अहेरी, राष्टीय वनपर्यावरण समिती चंद्रपूर, भ्रष्टाचार जनआंदोलन समिती आलापल्ली आणि वन्यप्रेमींनी दिला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-22


Related Photos