शेतीच्या लाकडी अवजाराची जागा घेतली लोखंडी औजारांनी , वृक्षतोडीचा फटका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रा. प्रमोद मशाखेत्री  / मुल :
दिवसेंदिवस जंगले नष्ट होत असल्याने खेडयापाडयात शेतीसाटी वापरली जाणारी लाकडी अवजारे दुर्मिळ होत चालली आहेत. त्यांची जागा आता लोखंडी अवजांरानी घेतल्याने सुतारांच्या  व्यवसायावर संकट आले आहे. सध्या खरीपच्या पेरणीची लगबग सुरू झाली असली तरी सुताराकडे शेती अवजारे बनविण्याचे काम कमी झाल्याचे दिसत आहे. 
 आपल्याकडच्या सामाजिक व्यवस्थेत बारा बलुतेदारांना महत्वाचे स्थान होते. संपूर्ण जनजीवन बलुतेराभोवती फिरायचे. वस्तुची देवाण घेवाण व्यवहार
व्हायचे. बलुतेदार पिढयानपिढया व्यवसाय करायचे.  सुतार,लोहार,चांभार,कुंभार,सोनार अशा बलुतेदारांच्या अनेक पिढयांनी त्यांच्या कामाबरोबरच एक कलाही जोपासली आहे. विकासाच्या ओघात काही  बलुतेदारांनी इतर शिक्षण घेवून पारंपारिक शिक्षण घेवून अन्य मार्ग पत्करले आहेत .मात्र बहुतांश सुतार व्यावसायिक समाज आजही आपल्या  पारंपारिक कलेवर उपजिविका करीत आहेत. शेतक-याला आवश्यक असणारी अवजारे बनविणे व दुरूस्ती करण्याचे काम सुतार या बलुतेदारांकडे आहे.    शेतीसाठी लागणारे नांगर,वखर,टिपण बैलगाडी इत्यादी अवजारे सुतार बनवित आहे. प्राचीन काळी मंदिरेही लाकडांची बनविली जात असत. एवढेच नाही तर  देवमुर्तीही लाकडाच्या असायच्या. कालांतराने लाकडी मंदिरे,मागे पडली असली तरी सुतारकामाचे महत्व संपले नाही. मर्यादित साहित्याचे चित्र आहे.  अलिकडच्या काळात सुतार व्यवसाय हा परंपरागत बैलगाडया,नांगर,लाकडी चाके अदृश्य होऊ लागली आहे. औद्योगिक का्रंतीचा हा एक अपरिहार्य परिणाम आहे.  तसेच अशाप्रकारे सरकारी गावरान जमिनी शेतीसाठी वापरल्या जात अहे. त्यामुळे शेतक-यांना रोजच्या वापरासाठी लाकूड मिळेनासे झाले.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-22


Related Photos