नाशिकमध्ये पोलिसाने केली गोळ्या झाडून सावत्र मुलांची हत्या


वृत्तसंस्था / नाशिक :  नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी संजय भोये यांनी स्वतःच्या सावत्र मुलांवर गोळीबार करून हत्या केली आहे. यात एक मुलगा जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी होता. मात्र नंतर उपचारांदरम्यान दुसऱ्या मुलाचाही मृत्यू झाला. ही घटना नाशिक येथील अश्वमेध नगरात शुक्रवारी  सकाळी सातच्या सुमारास राजमंदिर इमारतीत घडली. 
भोये यांनी दोन्ही मुलांना बाथरूममध्ये घेऊन जात केला गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती आहे. घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती आहे. दरम्यान, भोये यांच्या या कृत्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-06-21


Related Photos