‘ब्रिटिश हेराल्ड’ या मासिकाच्या सर्वेक्षणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :   लंडनमधील ‘ब्रिटिश हेराल्ड’ या मासिकाने घेतलेल्या एका सर्वेक्षणामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘२०१९ मधील जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती’ असल्याचा कौल वाचकांनी दिला आहे. या सर्वेक्षणामध्ये मोदींने अनेक बड्या नेत्यांना मागे टाकत वाचकांची पसंती मिळवली. मोदी हे सध्याच्या घडीला जगातील सर्वात शक्तीशाली नेते असल्याचे मत ३०.९० टक्के वाचकांनी नोंदवले आहे.या सर्वेक्षणात मोदींना ३०.९० टक्के, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना २९.९० टक्के, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २१.९० टक्के तर चीने राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना १८.१० टक्के मते मिळाली आहेत.
या सर्वेक्षणामध्ये जगभरातील एकूण २५ मोठ्या व्यक्तींच्या नावांचा समावेश होता. या सर्वेक्षणामधील प्रथामिक टप्प्यांनंतर तज्ज्ञांच्या समितीने चार जणांचा अंतिम फेरीसाठी निवड केली होती. वाचकांच्या मतांबरोबर संबंधित व्यक्तींसंदर्भात अभ्यास आणि अहवाल तयार करुन मोदींना हा पुरस्कार देण्यात आल्याचे ‘ब्रिटिश हेराल्ड’ने म्हटले आहे. 
ऑनलाइन माध्यमातून घेण्यात आलेल्या या जनमत चाचणीमध्ये खोटी मते नोंदवली जाऊ नयेत म्हणून प्रत्येक वाचकाला सर्वेक्षणाचा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी ओटीपी (वन टाइम पासवर्ड) देण्यात आला होता. या जनमत चाचणीला अपेक्षेहून अधिक प्रतिसाद मिळाल्याने अनेकदा वेबसाईट क्रॅशही झाली. या सर्वेक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी अनेकांनी वेबसाईटला एकाच वेळी भेट दिल्याने वेबसाईट क्रॅश झाल्याचे ‘ब्रिटिश हेराल्ड’ने म्हटले आहे. ३० लाख लोकांनी एका आठवड्यात वेबसाईटला भेट दिली. मात्र किती लोकांनी या सर्वेक्षणामध्ये मत नोंदवले याबद्दल वेबसाईटने आकडेवारी दिलेली नाही.
मोदींनी जाहिरातींच्या माध्यमातून #NaMo हा ब्रॅण्ड तयार केला असल्याचे ‘ब्रिटिश हेराल्ड’ने आपल्या लेखामध्ये म्हटले आहे. सक्षम नेतृत्व गुण आणि नागरिकांना दिलेल्या आश्वासनांच्या जोरावर मोदींची लोकप्रियता वाढली असल्याचे या लेखात नमूद करण्यात आले आहे. मागील काही वर्षांमध्ये जगभरातील बड्या नेत्यांच्या गाठीभेठी आणि परदेश दौऱ्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोदींची एक जागतिक नेता म्हणून प्रतिमा तयार झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असो किंवा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट असो आशिया खंडातील महत्वाचे नेतृत्व म्हणून मोदी जागतिक पातळीवर आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरले.   Print


News - World | Posted : 2019-06-21


Related Photos