अपघातातील जखमीचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : 
तालुक्यातील मानापुर - कोसरी मार्गावरुन अंगारा येथील बाजारला जात असतांना एमएच ४० ए १३२७ क्रमांकाच्या  गामा वाहनांची  एमएच ३३ एक्स ८४१७ ला  धडक बसली. या धडकेत दोघे जण गंभीर जखमी झाले होते. सदर   अपघात १७ जून रोजी घडला होता. या अपघातातील एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संदीप नामदेव शेंडे (३४) असे रा. आरमोरी असे मृतकाचे नाव आहे. 
अपघातात जखमी झालेले  दिपक दामोधर हेमके (५३) व संदीप नामदेव शेंडे (३४)  यांना प्राथमिक उपचारासाठी देलनवाडी आरोग्यकेंद्रात नेण्यात आले होते. तेथून आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र दुचाकी चालक संदीप व दीपक यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे ब्रम्ह्पूरी येथील खाजगी रुग्णालयात उपचारा करिता नेण्यात आले . दुचाकी चालक संदीप याच्या पोटाला गंभीर मार असल्यामुळे त्याच्या वर ख्रिस्तानंद हॉस्पिटल मध्ये  शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र उपचारा दरम्यान काल २० जून रोजी रात्री  प्रक्रुती गंभीर झाली व त्याचे निधन झाले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-21


Related Photos