विवाहितेवर बलात्कार, दोन आरोपींना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर : 
विवाहित महिलेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना देवलापार पोलीस ठाण्यांतर्गत एका गावात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.  प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित २० वर्षीय  विवाहित महिला प्रकृती ठीक नसल्याने काही महिन्यांपासून   माहेरी आली होती.  १८ जून रोजी  सायंकाळी ती मैत्रिणीकडून घरी परत येत असताना आरोपी दुचाकीने तिच्या पाठीमागून आले. तिला बळजबरीने दुचाकीवर नेऊन गावालगत असलेल्या नदीच्या काठावर आळीपाळीने बलात्कार केला.
त्यानंतर तिला तसेच सोडून पळून गेले. ती कशीबशी घरी आली व तिने आपल्या आईला सर्व हकिगत सांगितली. तिच्या आईने मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले. देवलापार पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींना अटक  करण्यात आली.   Print


News - Nagpur | Posted : 2019-06-21


Related Photos