पाईपवरुन पडल्याने कामगार जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुल :
येथील नवीन बसस्थानका मध्ये पाईपाला रंग मारण्यासाठी छतावर चढलेला  कामगार खाली पडून जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली . संजय सरोज (३०)  असे  जखमीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील  प्रतापगड येथिल  रहिवासी आहे.
 मूल येथिल उप जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे. ल येथे नवीन बसस्थानकाचे बांधकाम प्रगति पथावर आहे. एस आकाराच्या या बांधकामासाठी सद्या पाईप जोडणीचे काम एका कामगार कंत्राटदारामार्फत सुरू आहे. त्यासाठी पर प्रांतीय कामगार काम करीत आहेत. जोडलेल्या पाईपाला रंग मारण्यासाठी संजय सरोज हा पाईपाच्या छतावर चढला . मात्र , त्याचे संतूलन बिघडल्याने तो खाली पडला . गंभीर जखमी झालेल्या संजयला येथिल उप जिल्हा रुग्णालयात दाखल  करण्यात आले. दुखापत गंभीर असल्याने  प्राथमिक उपचारानंतर त्याला चंद्रपूर येथे भरती करण्यात आले आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-21


Related Photos