कोडीगाव येथे वीज पडून बैल ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
शहर प्रतिनिधी / मुलचेरा :
   तालुक्यात आज २० जून रोजी दुपारच्या सुमारास  पावसाचे आगमन झाले .  पावसासह प्रचंड वादळ व विजांचा कडकडाट झाला. पावसाच्या पहिल्याच दिवशी मूलचेरा तालुक्यतील कोडीगाव येथे  वीज पडून बैलाचा मृत्यू झाला आहे. 
एन शेतीच्या हंगामात बैलाचा मृत्यू झाल्यामुळे  शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.  खरीप हंगामाला सुरुवात झाली असून   बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. पहिल्याच पावसाने   अरविंद नैताम या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे.    अरविंद नैताम याना शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-20


Related Photos