रविवारी राज्यस्तरीय पात्रता चाचणी परीक्षा (SET) , गडचिरोलीत चार परीक्षा केंद्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार २३ जून रोजी होणार आहे. गोंडवाना विद्यापीठांतर्गत गडचिरोलीत चार केंद्रांवरून परीक्षा होणार आहे. या चारही परीक्षा केंद्रांवरून ९५७ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
गडचिरोली येथे शिवाजी महाविद्यालय, महिला महाविद्यालय, शासकीय विज्ञान महाविद्यालय आणि पदव्युत्तर शैक्षणिक विभाग गोंडवाना विद्यापीठ हे परीक्षा केंद्र ठरविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र या setexam.unipune.ac.in संकेतस्थळावरून उपलब्ध करून घ्यावे, सोबत मोबाईल आणू नये, दिलेल्या वेळेच्या १५ मिनीटे आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे, निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक तथा सेट परीक्षा समन्वयक डाॅ. अनिल झेड चिताडे यांनी केले आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-20


Related Photos