महत्वाच्या बातम्या

 ग्रामीण भागातील रुग्णालयात औषधांची मुबलक उपलब्धता : जिल्हा आरोग्य अधिकारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्हा परिषदेत एकुण ५३ प्रा. आ. केंद्र आणि ३१६ उपकेंद्र आहेत. या ठिकाणी शासनाच्या आवश्यक औषधाच्या यादीप्रमाणे सर्व प्रकारच्या औषधी सर्व प्रा. आ. केंद्र, सर्व उपकेंद, सर्व आरोग्यवर्धिनी केंद्र त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी सद्यस्थितीत मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अजय डवले यांनी कळविले आहे.

जिल्हा औषधी भांडारात मुबलक साठा उपलब्ध असून सर्व आरोग्य संस्थांना वितरित करण्यात आलेला आहे. तसेच आरोग्य संस्थांच्या गरजेनुसार व मागणीनुसार उपलब्ध साठ्यातुन पुरवठा करण्यात येत आहे. सन २०२३-२४ साठी जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद सेस फंड व इतर योजनांव्दारे निधीमधुन औषधी खरेदीची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. 

शासनाने १५ ऑगस्टपासून सर्व सेवा विनामुल्य केल्याने सर्व आरोग्य केंद्रातील बाहयरुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. गेल्या महिन्यात एकुण १ लाख २४ हजार २८२ रुग्णांनी औषधोपचाराचा लाभ घेतलेला आहे. सर्व सेवा विनामुल्य देण्यात येत असून कुणालाही बाहेरून औषधे विकत घ्यायला सांगितले जात नाही. त्याचप्रमाणे एकूण २५ प्रकारच्या तपासण्या विनामुल्य होतात. उच्च रक्तदाब व मधुमेह या असंसर्गजन्य आजाराकरिता लागणारी औषधी सर्व दवाखान्यात उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos