उद्या आंतरराष्ट्रीय योग दिवस , जिल्ह्यात ४४ शासकीय, निमशासकीय ठिकाणी आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली
: भारत  सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार २१ जुन यादिवशी संपुर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. त्यानुसार याच दिवशी जिल्ह्यात ४४ शासकीय, निमशासकीय ठिकाणी आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रम आयोजित केला आहे.
गडचिरोली तालुक्याच्या  मुख्यालयी पोटेगांव मार्गावरील क्रिडा प्रबोधिनी व जिल्ह्याच्या मुख्यालयी कॉम्लेक्स परीसरातील जलतरण तलावाच्या आवारातील सांस्कृतीक  भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ८ जुन २०१६ च्या शासननिर्णयानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुका  मुख्यालयी व ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १३ जुन रोजी जिल्हास्तरीय  समितीची सभा घेण्यात आली. यात जिल्ह्यातील योग विषयक क्षेत्रात कार्यरत संघटना, योगतज्ञ, योगप्रचारक आदींचा समावेश होता. या सभेत जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन व्यापक प्रमाणात साजरा होण्यासाठी ४४ शासकीय, निमशासकीय स्थळे निश्चित करण्यात आली. तालुकास्तरावर
गटशिक्षणाधिकारी यांनी तहसिलदार  यांच्याअध्यक्षतेखाली स्थानिक योग तज्ञांच्या माध्यमातुन कार्यक्रमाचे आयोजन करावे अशा सुचना संबंधितांना देण्यात आल्या. तसेच  जिल्हा मुख्यालयातील विविध शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, पतंजली योग समितीच्या विविध संघटना व आर्ट ऑफ लिव्हिंग जिल्हा संघटनेच्या माध्यमातुन काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांनी आपआपल्या सोयीने शक्य होत असेल तेथे जावुन आंतरराष्ट्रीय योग  दिनात सहभाग नोंदवुन लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांनी केले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-20


Related Photos