महत्वाच्या बातम्या

 वैद्यकीय क्षेत्रातून मोठी बातमी : लॅबमध्ये चक्क तयार केले रक्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : वैद्यकीय क्षेत्रातून सर्वात मोठी बातमी. जगात पहिल्यांदाच लॅबमध्ये रक्त तयार करण्यात आले आहे. एवढेच नाही तर हे रक्त पहिल्यांदाच दोन लोकांना देण्यात आले आहे.

एखाद्या लॅबमध्ये तयार करण्यात आलेल्या रक्ताची ही पहिलीच चाचणी आहे. पण जर ती यशस्वी ठरली तर वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे. कारण रक्तासंदर्भातल्या आजारांवर हे डुप्लिकेट रक्त संजीवनी ठरू शकते. खासकरुन ज्यांच्या रक्तगट दुर्मिळ आहे, अशा लोकांसाठी तर ते वरदान ठरणार आहे. कारण दुर्मिळ रक्तगट असलेल्यांना रक्त मिळवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ज्यामुळे अनेकांचा जीवही जातो. वैज्ञानिकांनी रक्तदातांच्या स्टेम सेलपासून हे रक्त विकसीत केले. क्लिनिकल टेस्टसाठी कमीत कमी चार महिन्यांत 10 लोकांना दोन वेळा हे डुप्लिकेट रक्त चढवण्यात येईल.

जागतिक क्लिनिकल चाचणीमध्ये मानवांना लॅबमध्ये तयार करण्यात आलेले कृत्रिम रक्त दिले गेले आहे. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत वाढलेल्या रक्तपेशींचा वापर जगातील अशा पहिल्या क्लिनिकल चाचणीसाठी करण्यात आला. दरम्यान, कृत्रिम रक्त सुरक्षित आणि प्रभावी सिद्ध झाल्यास, मानव निर्मित रक्तपेशी सिकलसेल आणि दुर्मिळ रक्त प्रकार यासारख्या रक्त विकार असलेल्या लोकांच्या उपचारांमध्ये वेळेत क्रांती घडवू शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.

यूकेमधील केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांसह या टीमने सांगितले की, रक्तपेशी दात्यांच्या स्टेम पेशींपासून वाढविण्यात आल्या. लालपेशीनंतर त्या निरोगी व्यक्तीला देण्यात आल्यात. प्रयोगशाळेत तयार केलेल्या लाल रक्तपेशी दुसऱ्या व्यक्तीला रक्त संक्रमणाच्या चाचणीचा भाग म्हणून दिल्या जाण्याची ही जगात पहिलीच वेळ आहे, असे केंब्रिज विद्यापाठातील संशोधकांच्या टीमने म्हटले आहे.

दरम्यान, लॅबमध्ये तयार करण्यात आलेले हे रक्त मानवी शरीरात जास्त काळ टिकेल, असा दावा करण्यात आला आहे. संशोधकांनी म्हटलेय, आम्हाला आशा आहे की आमच्या प्रयोगशाळेत वाढलेल्या लाल रक्तपेशी रक्तदात्यांकडून आलेल्या रक्तपेशींपेक्षा जास्त काळ टिकतील.





  Print






News - World




Related Photos