कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का : परिसरात भीतीचे वातावरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / सातारा :
येथे आज सकाळी भूंकपाचे धक्के बसले. भूकंपाची तीव्रता ४.८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेची होती. भूंकपाचा केंद्रबिंदू हा कोयनापासून १० किमीच्या अंतरावर होता. या भूकंपामुळे परिसरात काही वेळ घबराट पसरली होती. 
सकाळी ७.४८ वाजता कराड आणि पाटण परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. जिल्ह्यातील या भूकंपाची तीव्रता मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे.
भूकंपाची तीव्रता मोठी असली तरी कमी सेकंदासाठी भूकंप जाणवला. त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती आहे. सुरुवातीला काहीतरी गुढ आवाज आल्याने नागरिकांनी घराबाहेर येऊन पाहिले. मात्र, हा भूंकप असल्याचे समजताच घरातून बाहेर येत सुरक्षितस्थळी जाण्यासाठी सर्वांचीच धावपळ झाली होती. भूकंपानंतर जिल्ह्यातील कोयना परिसरात वास्तव करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.    Print


News - Rajy | Posted : 2019-06-20


Related Photos