वायएसआर काँग्रेस पक्षाला लोकसभा उपाध्यक्ष पदाची ऑफर, जगनमोहन रेड्डी यांची आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची अट


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :  १७ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर आता उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून पेच निर्माण झाला आहे. सरकारकडून जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला या पदाची ऑफर देण्यात आली, मात्र रेड्डी यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची अट घातली आहे.
लोकसभा उपाध्यक्षपदासाठी काही पक्षांनी दावा केला आहे. त्यात मित्रपक्ष शिवसेनेव्यतिरिक्त वायएसआर काँग्रेस आणि बीजेडी या पक्षांचा समावेश आहे. सर्वसाधारणपणे हे पद विरोधी पक्षाला देण्याची परंपरा आहे. याचेच पालन करून मागील कार्यकालात एआयएडीएमकेला हे पद दिले गेले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाला या पदाची ऑफर देण्यात आली; मात्र आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत सत्ताधारी पक्षासोबत उभे राहण्याची इच्छा नाही, अशी स्पष्ट भूमिका रेड्डी यांनी मांडली आहे. १६ व्या लोकसभेच्या काही सत्रांमध्ये याच मागणीवरून गदारोळ उडाला होता. आता पुन्हा वायएसआर काँग्रेस पक्ष याच मागणीवर अडून बसला तर पुन्हा संसदेत गोंधळ उडण्याची चिन्हे आहेत.  Print


News - World | Posted : 2019-06-20


Related Photos