महाऑनलाईन चे सर्व्हर बंद, ऐन प्रवेश काळातच विद्यार्थ्यांची अडवणूक


 विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रमोद मशाखेत्री / मुल  :
  ऐन शाळा,महाविद्यालयाच्या प्रवेशाच्या हंगामात शासनाच्या महाऑनलाईन  या पोर्टलचे सेर्व्हर मंगळवारी सायंकाळी अचानक बंद  करण्यात आले असून बुधवारी रात्रीपर्यंत हे पोर्टल डाऊन राहणार असल्याने विद्यार्थी व पालकांचा गांधळ उडला आहे.
 शासनाने सर्व कागदपत्रे महाऑनलाईन  प्रणालीव्दारे देण्याचे धोरण अवलंबले आहे.त्यानुसार त्याचे काम महाऑनलाईन  कंपनीला देण्यात आले आहे.सेतूच्या  माध्यमताून शाळा,महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी लागणारे सर्व प्रमाणपत्र तसेच विविध दाखले हे महाऑनलाईन च्या माध्यमातून देण्यात येतात. सध्या  शाळा,महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे. प्रवेश घेताना अनेक दाखले व प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे लागतात.   अचानक गर्दी झाल्याने महाऑनलाईन  पोर्टलवरील कामाचा ताण वाढल्याने मंगळवारी या पोर्टलचा वेग अचानक कमी झाला. डिजिटल स्वाक्षरी केल्यानंतरही  प्रमाणपत्रे बराच वेळ पेार्टलवर प्रलंबित राहत होती. त्यामूळे नागरिकांचा अधिकारी व कर्मचा-यावरील रोष वाढला. ही बाब सायंकाळी अचानक देखभाल  दुरूस्तीसाठी बंद करण्यात आल्याचा संदेश धडकला.त्यामूळे बुधवारी जवळपास तयार झालेले प्रमाणपत्र संबंधितांना वितरीत करता आले नाही.
 हे पोर्टल 19 जून मंगळवारी रात्री 8 वाजतापासून ते गुरूवारी रात्रौ 8.25  वाजेपर्यंत देखभाल या दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामूूळे गुरूवारीदेखील दिवसभर कोणतेही प्रमाणपत्राचे प्रस्ताव सेतुकडून स्विकारत  व वितरीत करता येणार नसल्याने पालव व विद्यार्थ्यांची चांगलीच  अडवणूक  होणार आहे.  शाळा महाविद्यालय प्रवेशासाठी लागणा-या प्रमाणपत्रासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, महाऑनलाईन  या पोर्टेलची देखभाल व दुरूस्ती यापूर्वीच करणे  गरजेचे होते. मात्र त्याकडे महाऑनलाईन ने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-20


Related Photos