महत्वाच्या बातम्या

 महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा ८ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्हा दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार ८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता शासकीय विश्रामगृह, चिमुर येथून मोटारीने कोलारी ता. चिमुरकडे प्रयाण. सकाळी ९.१५ वाजता कोलारी ता. चिमूर येथे आगमन तसेच कोलारी व साठगांव येथे नुकसानग्रस्त भागाची पीक पाहणी. सकाळी ९.४५ वाजता मोटारीने भिसी ता. चिमूरकडे प्रयाण. सकाळी ९.५५ वाजता भिसी येथे आगमन व नुकसानग्रस्त भागाची पीक पाहणी आणि विठ्ठल रुखमाई जिनिंग अँड प्रेसिंग, भिसी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधतील.

सकाळी १०:३० वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालय, चिमूर येथे आगमन. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा, नुकसानीच्या अनुषंगाने ई-पिक पाहणी, पिक विमा आढावा, वहिवाट रस्ते, सातबारा संगणीकरण, लम्पी आदीबाबत चंद्रपूर जिल्हा आढावा बैठक.

दुपारी १२.१० वाजता आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांच्या निवासस्थानी आगमन व सदिच्छा भेट. दुपारी १२:४५  वाजता वहानगांव (बोथली) ता. चिमूरकडे प्रयाण. दुपारी १ वाजता वहानगांव (बोथली) येथे आगमन व नुकसानग्रस्त भागाची पिक पाहणी. दुपारी १.३०  वाजता मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.





  Print






News - Chandrapur




Related Photos