महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरिता गडचिरोली जिल्ह्याला दत्तक घ्या : आ. डॉ. देवराव होळी यांची राष्ट्रपती महोदयांना विनंती


- नवी दिल्ली येथे १२ आमदारांच्या शिष्टमंडळात झालेल्या भेटी दरम्यान दिले निवेदन

- गोंडवाना विद्यापीठाला जागतिक कीर्तीचे विद्यापीठ करण्याविषयी केली आग्रही मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : गडचिरोली हा महाराष्ट्र राज्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्हा असून या जिल्ह्याची मागास जिल्हा म्हणून आजही ओळख कायम आहे. अनेक भागांमध्ये मूलभूत सुविधा पोहोचविणे आत्ता आत्ता कुठे सुरू झालेले आहे. आजच्या आधुनिक काळामध्ये या जिल्ह्याची मागासलेपणाची असलेली ओळख संपविण्याची गरज असून त्याकरिता आपल्या आशीर्वादाची व विशेष स्नेहाची आवश्यकता आहे. आपण हा जिल्हा दत्तक म्हणुन घ्यावा, अशी जिल्हा वासियांची मागणी असल्याची विनंती जिल्हा वासियांच्या वतीने आमदार डॉ. देवराव होळी यांनी नवी दिल्ली राष्ट्रपती भवनात १२ आदिवासी आमदारांच्या शिष्टमंडळाच्या  झालेल्या भेटीदरम्यान राष्ट्रपती महोदयांना निवेदनाच्या माध्यमातून केली.

आपण या जिल्ह्याला दत्तक म्हणून स्वीकारल्यास या जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल या जिल्ह्याला एक विकासात्मक ताकद मिळेल त्याकरता आपण गडचिरोली जिल्ह्याला दत्तक म्हणून स्वीकार करावा अशी विशेष विनंती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे केली.

याप्रसंगी त्यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे, तेलंगाना, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यांची सीमा जोडून असलेल्या महाराष्ट्र राज्यात असून या सर्व जोडुन असलेल्या राज्यात व सीमा भागात मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव राहतात. त्यामुळे आदिवासी जिल्ह्यात असणाऱ्या या गोंडवाना विद्यापीठाला जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून कीर्ती मिळावी या दृष्टीने या विद्यापीठाला विकसित करण्याची आवश्यकता असल्याची आग्रहाची विनंती आमदार डॉ. देवराव होळी यांनी राष्ट्रपती महोदयांना दिलेल्या पत्राच्या माध्यमातून केली.





  Print






News - Rajy




Related Photos