महत्वाच्या बातम्या

 दोनशेहून अधिक भागधारकांचा उद्योग विभागाच्या कार्यशाळेत सहभाग 


- उद्योजकांनी निर्यातदार बनावे 

- कार्यशाळेतील वक्त्यांचा सूर उत्पादनाचा दर्जा ठरवणार 

- निर्यातीचे मूल्य केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / भंडारा : एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र शासनाची धोरणे व उपक्रम याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी आज नियोजन सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यशाळेत आज २०० हून अधिक भागधारकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. भंडारा जिल्हा नैसर्गिक संपादने म्हणत असलेला जिल्हा आहे, वन डिस्टिक वन प्रॉडक्ट मध्ये धान हे उत्पादन आहे. उद्योजकांसाठी ही कार्यशाळा असली तरी महिला बचत गटांची उत्पादने सुद्धा निर्यात झाली पाहिजे.यासाठी बचत गटांना तसेच औद्योगिक घटकांना आवश्यक असलेले मार्गदर्शन या जिल्ह्यातच मिळण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन उद्योग विभागाने केले आहे.

यावेळी पंकज सारडा यांनी यशस्वी निर्यातदार होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींवर मार्गदर्शन केले तर राज्य शासनाच्या मैत्रि प्रकल्पाचे उमेश पाटील यांनी एक जिल्हा एक उत्पादन आणि औद्योगिक विभागाच्या विविध उपक्रमांची तशी योजनांची माहिती यावेळेस दिली. आजच्या या कार्यशाळेमध्ये सहभागी व त्यांनी त्यांच्या अनुभवातून विस्तृत मार्गदर्शन केले. छोट्या उद्योगांसाठी कार्यरत असणाऱ्या सीडबी संस्थेच्या योजना व अनुदानाची माहिती सिडबीचे व्यवस्थापक आशिष मुनघाटे यांनी दिली. एमएस एम ई ला करण्यात येणाऱ्या वित्तीय मदतीचे सादरीकरण विवेक निर्वांशवर यांनी केले. पोस्ट विभागाच्यावतीने अमोल ठवकर यांनी पोस्टाच्या लॉजिस्टिक्स मधील भूमिकेची मांडणी केली.

अंकित गुप्ता यांनी भंडारा जिल्ह्याचे एक्सपोर्ट प्लांट विषयीची सादरीकरण केले. केंद्रीय निर्यात महानिदेशक श्रमन यांनी ही विस्तृत पद्धतीने गुंतवणूक, निर्यातवृध्दी, उद्योग उत्पादन, डिजीटल मार्केटींग या विषयांवर सविस्तर चर्चा केली. या कार्यक्रमाका गजेंद्र भारती, उद्योग सहसंचालक, नागपूर विभाग, नागपूर व हेमंत बदर महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, यांनी अनुक्रमे प्रास्तविक व आभार व्यक्त केले.





  Print






News - Bhandara




Related Photos