महत्वाच्या बातम्या

 आयुष्मान योजनेचा लाभ देण्याकरिता लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड वाटप करावे : खासदार रामदास तडस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : आयुष्मान भारत योजनेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाेच्च प्राधान्य दिले आहे. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना १०० टक्के आयुष्मान कार्ड बनवण्यात यावे, जेणेकरून या योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्याला मिळू शकेल, या योजनेत एकही पात्र लाभार्थी वंचित राहु नये यासाठी नियोजन करावे, आयुष्मान योजनेचा लाभ देण्याकरिता लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करावे अश्या सुचना खासदार रामदास तडस यांनी बैठकीमध्ये केल्या.

०३ ऑक्टोबर २०२३ ला जिल्हाधिकारी कार्याल वर्धा येथे आयुष्मान भारत योजने अंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड, लाभार्थ्यांची EKYC रजिस्ट्रेशन नोंदणी, तालुका निहाय लाभार्थ्यांची यादी संदर्भात आढावा बैठक संपन्न खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत संपन्न झाली, यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, मुख्यकार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी राज पराडकर, गायकवाड, आयुष्मान भारत योजना भाजपा अध्यक्ष सतीश वैद्य, अमोल महाडीक, आकाश खोडवे उपस्थित होते.

बैठकीमध्ये योजने संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली, सर्व पात्र लाभार्थी आयुष्मान कार्ड बनवण्यापासून वंचित राहू नयेत, लाभार्थ्यांची म्ज्ञल्ब् रजिस्ट्रेशन नोंदणी करणे. वर्धा जिल्हयातील तालुका निहाय लाभार्थ्यांची यादी तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला दिल्या व  प्रत्येक ग्रामीण भागातील आयुष्यमान भारत कार्ड धारकांना लाभ मिळण्यासंदर्भात तसेच आयुष्यमान कार्ड लाभार्थ्यांना ताबडतोब कार्ड वितरण करण्यासंदर्भात ७ दिवसात प्रशासनाद्वारे माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी यावेळी दिली.





  Print






News - Wardha




Related Photos