महत्वाच्या बातम्या

 राजौरीतील आर्मी कॅम्पमध्ये लष्कर अधिकाऱ्याचा गोळीबार : ३ अधिकाऱ्यांसह ५ जण जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / जम्मू आणि काश्मीर : जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात लष्कराच्या छावणीवर एका अधिकाऱ्याने गोळीबार करत ग्रेनेडचा स्फोट केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या स्फोटात तीन अधिकाऱ्यांसह किमान पाच लष्करी जवान जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

माहितीनुसार, ही घटना जिल्ह्यातील ठाणमंडीजवळील नीली चौकी येथे घडली. एका मेजर रँकच्या अधिकाऱ्याने फायरिंग सराव सत्रादरम्यान कोणत्याही सुचनेशिवाय आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला आणि नंतर युनिटच्या शस्त्रागारात लपला. वरिष्ठ अधिकारी त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले असता त्याने त्यांच्यावर हँडग्रेनेड फेकून हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे आठ तासांनंतर गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्यावर नियंत्रण मिळवण्यात लष्कराला यश आले. सैन्याने खबरदारी म्हणून शस्त्रागार जवळील संपूर्ण एक गाव रिकामे केले. मात्र, राजौरी येथील चौकीवर ग्रेनेड अपघातात एक अधिकारी जखमी झाल्याचा दावा लष्कराने केला आहे.

लष्कराच्या व्हाइट नाइट कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, अधिकाऱ्याला बाहेर काढण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती दिली आहे.





  Print






News - World




Related Photos