महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यातील १११ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील सार्वत्रिक / पोट निवडणूक असलेल्या एकूण १११ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्य ३ ऑक्टोबर २०२३ च्या आदेशान्वये माहे जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व सन २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकासाठी संगणकप्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारीक पद्धतीने प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यात खालीलप्रमाणे राबविण्यात येत आहे. 

अशा प्रकारे आहे निवडणूक कार्यक्रम : 

तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा ६ ऑक्टोबर २०२३ शुक्रवार, नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ संबधित तहसिल कार्यालयाचे ठिकाणी १६ ऑक्टोबर सोमवार ते २० ऑक्टोबर २०२३ शुक्रवार सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ संबधित तहसिल कार्यालयाचे ठिकाणी २३ ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळी ११ वाजतापासून छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ २५ ऑक्टोबर बुधवार रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ २५ ऑक्टोबर बुधवार  दुपारी ३ वाजतानंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रविवार गडचिरोली जिल्हयासांठी स.७.३० वा.पासून ते सायंकाळी ५.३० वा.पर्यंत आणि मतमोजणीचा ७ नोव्हेंबर २०२३ मंगळवार रोजी होईल. 

तरी वरीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदारांनी/नागरिकांनी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडून आवाहन करण्यात येत असल्याचे निवडणूक विभाग, गडचिरोली यांनी कळविले आहे. 

अशी आहे निवडणूक होणा-या (सार्वत्रिक / पोट) ग्रामपंचायतींची संख्या :

कोरची – १७ ग्रामपंचायती, कुरखेडा – ४, देसाईगंज – १, आरमोरी – १, गडचिरोली – ६, धानोरा – २६, चामोर्शी – ७, मुलचेरा –४, अहेरी - ६, ऐटापल्ली – १३, भामरागड – १४ आणि सिरोंचा तालुक्यातील १२ अशा एकूण १११ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक / पोट निवडणूक होणार आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos