महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


६ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

१९०८ : ऑस्ट्रियाने बोस्‍निया व हेर्झेगोविना हे प्रांत बळकावले.

१९२७ : वॉर्नर ब्रदर्स चा जॅझ सिंगर हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.

१९४९ : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.

१९६३ : पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.

१९७३ : इजिप्त व सीरीयाने मिळुन इस्त्राएलवर हल्‍ला केला.

१९८१ : इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांची हत्या.

१९८७ : फिजी प्रजासताक बनले.

२००७ : जेसन लुइस याने वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

६ ऑक्टोबर जन्म

१७७९ : स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १८५९)

१८६६ : रेडिओटेलेफोनी चे संस्थोधक रेगिनाल्ड फेसेनडेन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै १९३२)

१८९३ : खगोल भौतिकशास्त्रज्ञ व संसद सदस्य मेघनाद साहा यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९५६)

१९१२ : अणूरसायन शास्त्रज्ञ, प्राध्यापक डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २०००)

१९१३ : कवी केशवसुत पारितोषिक विजेते कवी वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९९१)

१९१४ : नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक थोर हेअरडल यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल २००२)

१९३० : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक रिची बेनो यांचा जन्म.

१९४३ : संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक डॉ. रत्‍नाकर मंचरकर यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी २०१२)

१९४६ : अभिनेते, चित्रपट निर्माते व खासदार विनोद खन्ना यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल २०१७)

१९४६ : इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक टोनी ग्रेग यांचा जन्म. (मृत्यू: २९ डिसेंबर २०१२)

१९७२ : संगीतकार सलील कुलकर्णी यांचा जन्म.

६ ऑक्टोबर मृत्यू

१६६१ : शिखांचे ७ वे गुरू गुरू हर राय यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १६३०)

१८९२ : इंग्लिश कवी लॉर्ड टेनिसन यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १८०९)

१९५१ : केलॉग्ज चे मालक विल केलॉग यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १८६०)

१९७४ : भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांचे निधन. (जन्म: ३ मे १८९६)

१९७९ : इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १८९०)

१९८१ : इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते अन्वर सादात यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९१८)

२००७ : महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९२१)

२००७ : लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत एल. एम. सिंघवी यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९३१)

२०१५ : हंगेरी देशाचे पहिले अध्यक्ष अरपॅड गॉन्कझ यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १९२२)





  Print






News - todayspecialdays




Related Photos