६६ लाख ८८ हजार ४२२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४ हजार ४६१ कोटी रुपयांचे अनुदान जमा


वृत्तसंस्था /  मुंबई :  राज्य सरकारने १७ हजार ९८५ गावांतील ६६ लाख ८८ हजार ४२२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४ हजार ४६१ कोटी रुपयांचे अनुदान जमा केले अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी दिली. राज्याच्या १६ लाख ४९ हजार ६४७ कोटी रुपयांच्या स्थुल राज्य उत्पन्नात चार वर्षात १० लाख कोटी रुपयांनी वाढ होऊन ते २६ लाख ६० हजार ३१८ कोटी रुपये झाल्याचेही ते म्हणाले. 
दुष्काळग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असून दुष्काळ निवारणाच्या अनेक उपाययोजनांना शासनाने गती दिली आहे असे मुनगंटीवार यांनी सांगितले. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुर्नगठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, कृषी पंपाच्या चालू वीज देयकांत ३३.५ टक्के सूट अशा अनेक उपाययोजना दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.   Print


News - Rajy | Posted : 2019-06-19


Related Photos