महत्वाच्या बातम्या

 फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली द्वारा किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : ५ ऑक्टोंबर रोजी श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारे संचालित फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली येथे गोकुळनगर अंगणवाडी केंद्र ४४ यांचा संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश के. खंगार यांच्या मार्गदर्शनात किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

या मार्गदर्शन कार्यक्रमात किशोरवयीन मुलींना आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, किशोरवयीन मुलींनी दैनंदिन जीवनात घाव्याची काळजी या सम्पूर्ण महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन बी.एस.डब्लू भाग २,३ च्या विदिशा कुटारे, किरण हिळामी, मयुरी हलामी, रोहित मरस्कोल्हे, लावण्या येलकुचेवार, अच्युत बट्टे, चिराग पोरेड्डीवार, अमर वैरागडे, वैशू घुबडे, ऐश्वर्या शेंद्रे, रागिनी सोनटक्के, पायल मरस्कोल्हे, अविनाश उराडे, मिथीलेश्वर ढोलगे, भारती ठाठपलान, निकिता वाघरे, पल्लवी ढोलगे, निकिता शेडमाके, रेखा हलामी,  विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे करून कार्यक्रम यशस्वीपने पार पाडला.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हूणन सौ. नीता उंदीरवाडे, माजी नगरसेविका प्रमुख मार्गदर्शक म्हूणन डॉ. गेडाम वैद्यकीय अधिकारी नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र गोकुळनगर, प्रमुख अतिथी  प्रा. कविता उईके, प्रा. दिपक तायडे, मुन्नी बारसागडे अंगणवाडी सेविका गोकुळनगर, सिस्टर गीता डोंगरे, आशा वर्कर मेशं हे उपस्थित होते.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लावण्या येलकुचेवार या विद्यार्थिनीने केले तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी किरण हीलामी या विद्यार्थिनीने पार पाडली. या कार्यक्रमाला किशोरवयीन मुलींचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos