महत्वाच्या बातम्या

 १६ ऑक्टोबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, यादृष्टीने महिलांच्या तक्रार/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनासाठी शासनाने महिला लोकशाही दिवस साजरा करण्याकरिता सुचित केले आहे.

त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. सोमवार, १६ ऑक्टोबर २०२३ रोजी सोमवार सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या दालनात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी असे प्रकरण स्विकारण्यात येणार नाहीत. तरी ज्या महिलांचे वरिल बाबी सोडून तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेअसतील अशा महिलांचे अर्ज १५ दिवसांपूर्वी विहीत नमुण्यात असलेले अर्ज दोन प्रतीत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे स्विकारण्यात येईल. जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनामध्ये तक्रार अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली, बॅरेक क्र.१ खोली क्र.२६ व २७ कलेक्टर कॉम्प्लेक्स गडचिरोली या कार्यालयात नि:शुल्क उपलब्ध होईल, याची नोंद घ्यावी, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos