महत्वाच्या बातम्या

 ११ ऑक्टोबर रोजी शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाकरीता क्रीडा संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने सन २०२३ -२४ या सत्रात विविध स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सदर स्पर्धेचे आयोजन जिल्हा एकविध क्रीडा संघटनांच्या तांत्रिक सहकार्याने करावयाचे असल्याने शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये नव्याने समाविष्ठ झालेले फिल्ड आर्चरी, बेल्ट रेसलींग, बिच व्हालीबॉल, हुप क्वान दो, युम मुन दो, चायक्वांदो या क्रीडा प्रकारांचे जिल्हास्तर व विभागस्तरीय स्पर्धा आयोजन करण्याची जबाबदारी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचेकडे सोपविण्यात आली आहे. उपरोक्त स्पर्धाचे यशस्वी आयोजन व तांत्रिक जबाबदारी सांभाळण्याकरीता क्रीडा संघटनेच्या पदाधिका-यांची बैठक ११ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११.३०  वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आली आहे. तरी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सभेकरीता उपस्थित राहावे. जेणेकरून सदर स्पर्धेचे राज्यस्तर स्पर्धेपूर्वी आयोजन करणे सोईचे होईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos