महा-ई-सेवा केंद्राना बंदची लागण , वयोवृध्दांची होते फरपट


- अर्ज भरूण देण्याकरीता आकारतात अवाजवी शुल्क
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / मुल 
:  मूल तालूक्यातील अनेक महा-ई-सेवा केंद्रांना  बंदची लागण झाली असून अद्यापपावेतो बंद स्थितीत असल्याने तालूक्यातील
नवीन लाभार्थ्यांना संगायो,श्रावणबाळ,इंकम,डोमेशियल,नाॅनक्रिमीअर,उत्पनदाखला, शेतमजुर, भुमीहीन दाखल आदीच्या नवीन अर्जाकरीता पायपीट करावी लागत असल्याने  वयोवृध्द नागरीकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. 
मुल तालुक्यातील ४७ महाई - सेवा केंद्राची यादी अजून पर्यंत तहसील कार्यालयात दर्शनी भागात फलक नाही. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी दिली आहे. मात्र,यातील जवळपास ७ केंद्र बंद असल्याने  लाभाथ्र्यांना  फाॅर्म भरण्याकरीता इतरत्र पायपीट करावी लागत आहे. ही ई सेवा केंद्र सेवा देण्यासाठी की त्रास देण्यासाठी ? असा वृध्द  लाभार्थ्यांचा सवाल आहे.
 तक्रारी प्राप्त झाल्यावर मारोडा,राजोली,भेजगाव,गडीसूर्ला, स्थानिक मुल मधील ३ आदी ई-महासेवा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी काही केंद्रे बंद आढळली. तेथील लाभार्थ्यांशी संवाद साधून ऑनलाईन अर्ज  भरण्याकरिता परिपूर्ण माहिती भरल्यावरच नोंदणी केली जाते. मूळ प्रती स्कॅन करून अर्ज केल्यास  नोंदणी सोयीची हेाते, असे पटवून शंकेचे निवारण केले.  तालूक्यातील ४७ महाईसेवा केंद्रांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ३० ऑनलाईन प्रकरणाची सेवा देणे बंधनकारक आहे. मात्र,अनेकांनी सेवा केंद्रच  सुरू केले नसल्याने लाभार्थी वंचित राहत आहेत. याशिवाय सुरू असलेल्या केंद्रात ऑनलाईन फाॅर्म भरून देताना शासकीय शुल्क ३४ रूपये असतांना  न आकारता अवाजवी शुल्क घेतले जाते. तब्बल १०० ते ५०० रूपये उकळले जातात.
 लाभार्थ्यांना होणारा त्रास,अडीअडचणी लक्षात घेता जिल्हाधिकरी ,उपविभागीय अधिकारी ,तहसिलदार यांनी त्यांची मान्यता रद्द करून त्यांच्याऐवजी गरजु, बेरोजगारांना केंद्राकरीता मान्यता दिल्यास  लाभार्थ्यांच्या दृष्टीने हिताचे होऊन त्यांची पायपीट थांबेल,असा ग्रामस्थांचा सुर आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-18


Related Photos