अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास मंडळासाठी २०० कोटी रूपयांची तरतूद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : 
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास मंडळासाठी २०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षासाठी १००  कोटी रूपये देण्यात येणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. तसेच ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी भरीव तरतूद करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 
अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त १०० कोटी रूपये देण्यात येणार असून ओबीसी मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या बांधणीकरिता 200 कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. तसेच सध्या 36 वसतीगृहे बांधण्याचा निर्धार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याव्यतिरिक्त अन्य महत्त्वाच्या घोषणाही करण्यात आल्या.
राज्यात सरपंचांच्या मानधन वाढीसाठी २०० कोटी रूपये, एसटी महामंडळाच्या बसस्टँड उभारणीसाठी १३६ कोटी रूपये देण्यात आले आहे. तसेच तीर्थक्षेत्रातील सर्व बस स्थानकाच्या नुतनीकरणासाठी १०० कोटींचा निधींची तरतूद करण्यात आली आहे. ७०० बसेस खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच ७ मार्च २०१९ रोजी महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले असून त्यातून राज्याला जागतिक स्तरावर गुंतवणुकीचे केंद्र बनवून १० लाक कोटी रूपयांची गुतवणूक आकर्षित करण्याचा मानस आहे. त्यातून ६० लाख नवे रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.  Print


News - Rajy | Posted : 2019-06-18


Related Photos