महत्वाच्या बातम्या

 उद्योग क्षेत्रातील भागधारकांसोबत कार्यशाळेचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र शासनाची धोरणे व उपक्रम याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी  भागधारकांसोबत  एक दिवसीय कार्यशाळेचे उद्या ६ ऑक्टोंबर  रोजी आयोजन करण्यात आले आहे. निर्यातदार उद्योजकांसाठी हे संमेलन असून नियोजन भवनात याचे आयोजन करण्यात आले आहे .

या संमेलनामध्ये गुंतवणूक, निर्यातवृध्दी, उद्योग सुलभीकरण, एक जिल्हा एक उत्पादन, डिजीटल मार्केटींग इ. विषयांवर चर्चासत्र आयोजित केले असून, अधिकारी व अनुभवी प्रवक्त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. कार्यक्रमाचे उदघाटन अध्यक्ष  जिल्हाधिकारी  योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता होणार असून या कार्यक्रमात जिल्हयातील सर्व उद्योजक निर्यातदारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन  गजेंद्र भारती, उद्योग सहसंचालक, नागपूर विभाग, नागपूर व  हेमंत बदर महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, भंडारा यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos