महत्वाच्या बातम्या

  जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध उपक्रमांव्दारे पोषण विषयक जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय पोषण महीना  सप्टेंबर महीन्यात विविध पोषणविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोषण आहार प्रदर्शनी आयोजीत करण्यात आली असून जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. दीपचंद सोयाम यांच्या हस्ते पोषण आहार प्रदर्शनी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अतुलकुमार टेभुर्णे, अधिसेविका लिमजे, आहारतज्ञ रंजना पांडे, समाजसेवा अधिक्षक सुधीर दहिवले, टिचकुले सिस्टर, इत्यादी उपस्थित होते. संपूर्ण महिनाभर पोषण आहार प्रदर्शनी लावण्यात आली. या कार्यक्रमाअंतर्गत बाह्य रुग्ण विभाग, आहार सल्ला केन्द्र, बालरोग विभाग, कुटुंब नियोजन विभाग, स्त्री रोग विभाग, नवजात आगमन कक्ष, स्त्री आंतररुग्ण विभाग इत्यादी. विभागामध्ये संपूर्ण महिनाभर पोषण आहार विषयक समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले.

राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. व परीक्षकाद्वारे परीक्षण करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनींना पारीतोषीक आणि प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकीत्सक, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक, अधिसेविका यांच्या हस्ते देण्यात आले.

या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आहारतज्ञ रंजना पांडे, समाजसेवा अधिक्षक सुधीर दहिवले यांनी केले. तसेच हे सर्व  कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता  जिल्हा शल्य चिकीत्सक सोयाम यांनी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले. तसेच अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक, अधिसेविका, परीसेविका कर्मचारी आणि  शासकीय परीचारीका महाविद्यालय येथिल विद्यार्थिनी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.





  Print






News - Bhandara




Related Photos