झारखंडमध्ये सहा नक्षल्यांचं आत्मसमर्पण : तीन महिलां नक्षल्यांचा समावेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / दुमका :
झारखंडमधे तीन महिला नक्षलवादींसह एकूण सहा माओवादी नक्षलवाद्यांनी सोमवारी येथे शरणागती पत्करली. या नक्षलवादींना हजारीबाग खुल्या तुरुंगात ठेवले जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक वाय. एस. रमेश यांनी सांगितले. या सर्व सहा नक्षल्यांना  पकडण्यासाठी सरकारने बक्षीस लावले होते. नक्षल्यांनी  आत्मसमर्पण केल्याने बक्षिसाच्या रकमेचे धनादेश त्यांना देण्यात आले. यावेळी दुमका विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक राजकुमार लाकरा उपस्थित होते.
प्रेमशिला देवी, किरण टुडू, प्रिसीला देवी, भगत सिंग किसकू, सुखलाल डेहरी आणि सिधो मरांडी या सहा नक्षल्यांनी  रमेश यांच्यापुढे आत्मसमर्पण केले . . यापैकी प्रेमशिला देवी आणि किरण टुडू हे सीपीआय (माओवादी)चे झोनल कमांडर होते. वरिष्ठ नक्षलवादी महिलांचे शोषण करतात, असे प्रेमशिला आणि किरण यांनी सांगितले.  Print


News - World | Posted : 2019-06-18


Related Photos