महत्वाच्या बातम्या

 जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. सदर जिल्हास्तरीय स्पर्धा गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या कॅरम रूम मध्ये आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून स्पर्धक सहभागी झाले होते त्यात सैनिकी विद्यालयाच्या१४ वर्षे वयोगट मध्ये वैभव भोयर १७ वर्षे वयोगट मध्ये केतन बोलेबयनीवार, प्रज्वल लखमापुरे, भूषण आम्बोरकर १९ वर्षे वयोगट मध्ये सुशांत केराम, वेदांत चेनेल्लीवार, मयूर  कावले, तुषार इंदुरकर असे एकूण ८विद्यार्थ्यांचे विभागीय स्तरा करिता निवड झाली आहे. पुढील विभागीय स्पर्धा २५ तारखेला गोंदिया येथे होणार आहे. 

यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक कैलाश उपाध्ये व क्रीडा प्रमुख भूपेंद्र चौधरी यांना दिले आहे. त्यांच्या या यशाबद्दल यशस्वीतांच भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरी चे सचिव धर्मरावबाबा आत्राम, अध्यक्ष भाग्यश्री आत्राम(हलगेकर), मार्गदर्शक ऋतुराज हलगेकर तथा विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी, उपमुख्याध्यापक ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे, व सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदांनी अभिनंदन केले आहे व विभागीय स्पर्धेकरिता शुभेच्छा ही दिल्या आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos