महत्वाच्या बातम्या

 आ. विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातून मंजूर ग्राम मुरपार येथे ३ कोटी ६३ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न


- गावातील अनेक नागरिकांनी जनतेची पार्टी (चाबी संघटना) मध्ये सामील होऊन जनसेवेचा घेतला संकल्प

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया विधानसभा मतदारसंघातील मुरपार गावात ३ कोटी ६३ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न झाला. दरम्यान, गावातील अनेक नागरिकांनी जनता की पार्टी (चाबी संघटना) मध्ये सामील होऊन जनसेवेचा संकल्प घेतला. आमदार विनोद अग्रवाल यांनी स्वतः पक्षाचा दुपट्टा घालून सर्वांचे जनता कि पार्टी परिवारात स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नामुळे कोट्यवधींच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहेत. मात्र आमदार विनोद अग्रवाल हे कोणत्याही प्रकारचा मोठा खर्च न करता, गाजावाजा न करता मोठमोठ्या कामांचे भूमिपूजन सहजासहजी करताना दिसतात. याआधी एका कामाचे ५ वेळा भूमिपूजन होतांना जनतेने पहिले आहे. मात्र करोडो रुपयांच्या कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पहिल्यांदाच इतक्याच सहज पद्धतीने गोंदिया विधानसभेत होताना दिसत आहे.

भुमिपुजनामध्ये मुरपार बघोली डामरी रोड मज़बूतीकरण १.३८ कोटी, मुरपार गर्रा रास्ता बांधकाम १ कोटी, मुरपार में समाजभवन बांधकाम १२ लक्ष या कामांचा समावेश आहे. तसेच लोकार्पणाच्या कार्यक्रमामध्ये मूरपार गाँव अंतर्गत रास्ता बांधकाम ३० लक्ष, मूरपार बघोली सीमेंट रास्ता २८ लक्ष, मुरपार ते बघोली रास्ता सीमेंटीकरण ३० लक्ष, समशान भूमि रास्ता सीमेंटीकरण ५ लक्ष, मुरपार क्रमांक १ आँगनबाड़ी बांधकाम ८.५० लक्ष, मूरपार डोंगरेजी च्या घराजवळ बोरवेल १.१७ लक्ष, मूरपार सिरपुर रास्ता सीमेंटीकरण १० लक्ष, अवंती चौक स्मारक सौंदर्यीकरण १० लक्ष, अवंती चौक परिसर रास्ता बांधकाम १० लक्ष इत्यादी कामांचा समावेश आहे.

दरम्यान विधायक विनोद अग्रवाल, भाउराव उके सभापती कृषि उत्पन्न बाजार समिति तथा अध्यक्ष जनता की पार्टी, छत्रपाल तुरकर, अध्यक्ष जनता की पार्टी, संगायो, समिती अध्यक्ष, मुनेश रहांगडाले सभापती पस. गोंदिया, चैतालीसिंह नागपुरे, महिला तालुकाध्यक्ष, बालू लिल्हारे सरपंच, ममता लिल्हारे उपसरपंच, लखन हरिनखेड़े उपाध्यक्ष जनता की पार्टी, सुजीत येवले उपाध्यक्ष जनता की पार्टी, जियालाल बोपचे उपाध्यक्ष जनता की पार्टी, चेतन बहेकार महामंत्री, फिरोज बंसोड अध्यक्ष अनुसचित जाती मोर्चा आघाडी, अनंदा वाढवे जिप सदस्य, दिपाताई चंद्रिकापुरे जिप सदस्य, वैशालीताई पंधरे जिप सदस्य, ममताताई वाढवे जिप सदस्य, सूर्यमणि रामटेके, महामंत्री अनुसूचित जाती मोर्चा, कैलाश दाऊदसरे माजी उपसरपंच, मंगल मस्करे तमुस अध्यक्ष, पुष्पा कुवरलाल मेश्राम, किशोर भिवाजी वासनीक ग्राम पंचायत सदस्य, मिथुन भालाधरे ग्राम पंचायत सदस्य,रेखाबाई बिसेन ग्राम पंचायत सदस्य, मंदीप वासनिक संजय वासनिक, मदन वासनिक, सेवक मेश्राम,सिदार्थ मेश्राम, प्रमदास रंगारी,  गजानन वासनिक, परमानंद वासनिक, मनोज वासनिक, रितेश डोंगरे,  मनोज बु. वासनिक, भरतलाल रंगारी, दिलीप रंगारी, जितेन्द्र गजभिये, भिवराव वसानिक, बाबुलाल वासनिक, श्यामसुंदर वासनिक,अजितजी वासनिक, गुलाबजी मेश्राम,मुकेशजी मेश्राम, कमलेश सके, मछीद खोब्रागडे, व्यकट उके, गजेन्द्र गजभिये, आकाश उके, धुर्वधन वासनिक, पूर्षोत्तम वासनिक, महेश भालाधरे, अशोक मानकर,अशोक मानकर, कारुदासजी वासनिक, राजेश गेडाम, राजकुमार वासनिक, सुर्यकांत बोम्बार्डे, अमितजी रंगारी, गौरव खोब्रागडे, संदीप रंगारी,विरेन्द्र रंगारी, विश्वास वासनिक, अश्विनभालाधरे, रत्नादिप वासनिक, सागर उके, विकास गेडाम, बीसराम गोरपटे, गंजानन नागपुरे, ग्यानीराम वासनिक इत्यादी कार्यकर्ते गाँवकरी पदाधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Gondia




Related Photos