वृद्धापकाळ योजनेत बोगस लाभार्थ्यांना फायदा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुल :
शासनाच्या विशेष सहाय्यक योजनेत राज्यातील ६५ वर्षावरील निराधार वृध्द व्यक्तींना मासिक निवृत्तीवेतन देण्यात येत असते. नुकतेच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या  इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनांच्या मानधानात वाढ केली आहे. वृद्धापकाळ योजनेचा लाभ वयाच्या ६५ व्या वर्षानंतर देण्यात येतो. परंतु  तालूक्यात जन्मतारीख व वर्षामध्ये खोटे दस्तऐवज सादर करून वयाच्या ५५ वर्षापासून शासनाकडून आथिे लाभ घेत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत.
 ६० ते ६५ वर्षावरील दारिद्र्य रेषेखालील कुटूंबियाच्या यादीत नाव असलेल्या निराधार स्त्री व पुरूषांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती योजनेमधून मानधन देण्यात येते. या योजनेस पुरस असलेल्या या राज्य शासनाच्या श्रावणपबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनोमधून लाभाथ्र्यांना प्रतिमाह ६०० रूपये इतके निवृत्तीवेतन देण्यात येते. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजगा गट ब ही योजना जे खरोखर गरजू निराधार वृध्द आहेत. मात्र दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये ज्यांची नोंद नाही व त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रूपायांपर्यंत असेल अशा वृद्धांना मानधन देण्यात येते.
 या योजनेचा नेहमी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न झाला आहे. मी आइवडीलांना सांभळत नाही समाजातील वृध्दांच्या बाबतीत काळजी घेण्याची समाजाची मानसिकता कायम राहावी म्हणून शासनाने आईवडील सांभाळ कायदा सन २०१७ मध्ये देशभर लागू केला आहे. असे लाभार्थी वृध्दापकाळ योजनेचा फायदा घेताना दिसून येत आहे. वृध्दापकाळ योजनेच्या लाभाथ्र्यांना जन्मतारखांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामूळे ख-या लाभाथ्र्यांना लाभ देणे महत्वाचे आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-18


Related Photos