महत्वाच्या बातम्या

 शिवशौर्य जागरण यात्रेचे लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांनी केले स्वागत


- श्री छत्रपती शिवाजी महाराज जागरण यात्रेचे गडचिरोली शहरामध्ये आगमन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : शिवराज्याभिषेक ३५० वर्ष पूर्ती निमित्याने विश्व हिंदू परिषद व बजरंग दल च्या वतीने श्री. छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे संपूर्ण देशभरात आयोजित करण्यात आले.

श्री. छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आगमन गडचिरोली शहरांमध्ये झाले. त्यानिमित्ताने चंद्रपुर रोडवरील पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस येथे लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे व पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेसचे संचालक अनुराग पिपरे यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत पुष्पहार अर्पण करून श्री. छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे स्वागत केले.

यात्रेमध्ये शिवप्रतिष्ठान सांगली चे प्रल्हाद पांडुरंग माने, गौरक्षक प्रफुल बिजवे, बजरंग दल जिल्हा संयोजक सचिन ठाकूर, जिल्हा मठमंदिर प्रमुख सुरज काटवे, प्रखंड मंत्री विशाल बिजवे, प्रखंड संयोजक बालाजी भांडेकर व विश्व हिंदू व परिषद बजरंग दल संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos