महत्वाच्या बातम्या

 कोरची शहरातील नळाला गढूळ पाणी : नगरपंचायतीचे दुर्लक्ष नागरिकांचे आरोग्य धोक्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची : कोरची शहरामध्ये मागील पाच ते सहा दिवसापासून नळाला गढूळ पाणी येत असून या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तेल मिश्रीत पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाणी शहरातील नागरिकांना नाईलाजाने प्राशन करावे लागत आहे. शहरातील वार्ड क्र ०९ मधील नळाला मागील सहा दिवसांपासून गढूळ पाणी येत आहे तर वितरण व्यवस्थेतील दोषामुळे शहरातील अनेक वार्डात नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून आधीच पाण्यामुळे नागरिकांची प्रकृती खराब होत आहे, अशा मध्ये गढुळ पाण्याचा पुरवठा नळाला केला जात असल्याने नागरिकांना उलटी, पोटदुखी, अतिसार, काँलरा, हगवण, टायफाईड आणि कावीळ यासारख्या अनेक साथीच्या आजारांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे काही नागरिक विकतचे पाणी घेऊन पिताना दिसून येत आहेत. नगरपंचायतच्या दुर्लक्षितपणाबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शहरात विविध विकास कामांच्या धडाका सुरू असला तरी पाणी समस्या नेहमीच पावसाळ्याच्या दिवसात व उन्हाळ्यात होतो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न  ऐरणीवर आला आहे शहरात होणारा पाणीपुरवठा हा अत्यंत गढुळ आणि तेल मिश्रित दुर्गंधीयुक्त पिवळसर होत आहे. याचा विपरीत परिणाम सहवासीयांच्या आरोग्यावर होत आहे. शहरातील अनेक वार्डामध्ये नगरपंचायतनी करोडो रुपये खर्च करून सोलर नळ योजना सुरू केली परंतु नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही.

कोरची नगरपंचायतला सन २०२२-२३ मध्ये घरपट्टी वसुलीमध्ये महाराष्ट्रातून तृतीय क्रमांक मिळाले आहे यासाठी महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. परंतु शहरातील नागरिक घरपट्टी, पाणीपट्टी नियमित भरत असले तरी सुद्धा नागरिकांना विद्युत, पाणी, रस्ते यासह विविध सोई सुविधा नगरपंचायत प्रशासनाकडून पुरवले जात नाही याकडे लोकप्रतिनिधीचा दुर्लक्ष होत असून शहरवासीयांना अनेकदा पाण्याची समस्या भेडसावत राहते.

काही दिवसांपूर्वी ढोल्यातील पाण्याचा पंम्पामध्ये बिघाड झाले होते, त्यामुळे नळाला गढूळ पाणी येणे सुरू झाले होते, मात्र सोमवारी पंम्पाचा कामास सुरुवात करण्यात आली आणि मंगळवार पासून नळाला शुद्ध पाणी सुरू झाले आहे.
(कुलभूषण रामटेके मुख्याधिकारी नगरपंचायत कोरची.)





  Print






News - Gadchiroli




Related Photos