ईव्हीएम हटाव च्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे घंटानाद आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
ईव्हीम मशिन चा वापर बंद करून निवडणूका बायलट पेपर द्वारे घेण्यात याव्यात या मागणीसाठी आज १७ जून रोजी दुपारी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी गडचिरोली कार्यालयासमोर तिव्र घंटानाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घंटानाद केल्याने व घोषणा दिल्याने संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांची भेट घेऊन त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त भारत सरकार नवी दिल्ली या़ंच्या नावाने लिहिलेले निवेदन सादर केले. ईव्हीम हटाव देश बचाव अशा घोषणा देण्यात आल्या.
या आ़ंदोलनात प्रामुख्याने भारिप बहुजन महासंघाचे जेष्ठ नेते रोहीदास राऊत साहेब,पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज बडोले,प्रा. प्रकाश दुधे जिल्हा.सल्लागार प्रा.राजन बोरकर जिल्हा सरचिटणीस जिल्हा महिला अध्यक्षा निताताई सहारे हेमंत    सहारे  जिल्हा संघटक अनिल बारसागडे शहर अध्यक्ष सरचिटणीस ज्योति उंदिरवाडे, हंसराज ऊंदिरवाडे  अशोक खोब्रागडे जिल्हा सहसचिव, संदिप रहाटे जिल्हा अध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुण्यवान सोरते ता.ऊपाध्यक्ष, नरेंद्र रायपूरे जिल्हा युवक आघाडीअध्यक्ष तैलेश बांबोळे ता.अध्यक्ष चामोर्शि.वनमाला झाडे महीला शहराध्यक्ष माधुरी शंभरकर कौशिक ऊंदिरवाडे,मुक्ताजी दुर्गे, वासुदेव अंबादे,राजु अंबादे वअन्य कार्यकर्ते उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-17


Related Photos