सोनापूर येथे क्लस्टर कार्यशाळेत दारूबंदीवर चर्चा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चामोर्शी :
तालुक्यातील सोनापूर येथे झालेल्या तीन गावांच्या क्लस्टर कार्यशाळेत गावातील दारूबंदी साध्य करण्यासाठी आवश्यक उपायांवर चर्चा करण्यात आली. जवळपास ४० महिला पुरुष यावेळी उपस्थित होते.
 सोनापूर, वाकडी आणि मुरखळा चेक या गावांसाठी ही क्लस्टर कार्यशाळा मुक्तिपथ तालुका चमुद्वारे घेण्यात आली. वाकडी आणि मुरखळा चेक या गावांमध्ये दारूविक्री बंदीचे ठराव घेण्यात आले आहेत. विक्री बंद ठेवण्यासाठी गाव संघटन सक्रीय भूमिका घेत आहे. पण सोनापूर येथे दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होते. सहा ते सात विक्रेते येथे सक्रीय आहेत. याचा विपरित परिणाम इतर गावांवर होतो. त्यामुळे सोनापूर गावाने दारूविक्री बंद करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
वाकडी आणि मुरखळा चेक येथील महिलांनी स्वतःच्या गावातील दारूबंदी साठी करीत असलेल्या प्रयात्नाविषयी यावेळी सांगत सोनापूर येथील गावकऱ्यांनी दारूविक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सोनापुरचे सरपंच, पोलीस पाटील, माजी तंटामुक्ती अध्यक्ष यासह इतरही प्रमुख मंडळी उपस्थित होती. दारूबंदीसाठी ठोस कारवाई करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-17


Related Photos