गडचिरोलीत रिमझीम पावसाला सुरूवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शेतकऱ्यांसह सर्वांनाच प्रतीक्षा लागून असलेल्या पावसाने  थोडीफार का होईना आज हजेरी लावली आहे. आज १७ जून रोजी पावसाच्या रिमझिम सरींना सुरूवात झाल्यामुळे नागरीकांना पहिल्या पावसाचे दर्शन झाले आहे.
मान्सूनच्या आगमनाबाबत मागील अनेक दिवसांपासून हवामान विभागाचे अंदाज बदलत आहेत. अशातच १७ जून नंतरच मान्सून महाराष्टात सक्रीय होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. आज पहाटेपासूनच आकाशात थोडफार ढग दाटून यायला सुरूवात झाली. दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरासह काही भागात रिमझीम सरींना सुरूवात झाली. यामुळे उकाड्यात काही प्रमाणात घट झाली आहे. शेतकरी राजा आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. संपूर्ण हंगामाची तयारी झाली असून जोरदार पाउस आल्यास पेरणीच्या कामास वेग येणार आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-17


Related Photos