महत्वाच्या बातम्या

 धान विक्री करीता शेतकऱ्यांनी नोंदणी करावी 


- २० केंद्रावर खरेदी सुरू पणन विभागाचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप पणन हंगाम २०२३-२४ करीता भंडारा धान विक्री करणाऱ्या  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कळविण्यात येते की,पणन महासंघाच्या अ वर्ग सभासद असलेल्या संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी हंगाम २०२३-२४ मध्ये धान विक्री करण्याकरिता आपल्या नावाची नोंदणी करावी. त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे जसे की जमिनीचा सातबारा उतारा, नमुना, ८, बॅकेचे पासबुक अथवा रद्द केलेला धनादेश, अद्यावत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड, इत्यादी कागदपत्रे खरेदी केंद्रावर जाऊन तिथे आपली नावे नोंदवावी.जेणेकरुन हंगाम २०२३-२४ मध्ये धान खरेदी करता येतील, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, भंडारा यांनी कळविले आहे.

तालुका व संस्थेचे नाव तसेच  धान खरेदी केंद्राचे नावे पुढील प्रमाणे आहेत. सहकारी धान्य गिरणी लिमिटेड, कारधा,तालुका भंडारा, जिल्हा कृषी औद्योगिक संघ लिमिटेड, धारगाव तालुका भंडारा, दि. लक्ष्मी सहकारी धान गिरणी मर्या. वाकेश्वर तालुका भंडारा,सहकारी शेतकी खरेदी विक्री संघ लिमिटेड, मोहाडी, तालुका मोहाडी, सहकारी शेतकी विक्री संघ लिमिटेड मोहगावदेवी तालुका मोहाडी, सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती. लि. हरदोली सिहोरा, तालुका तुमसर, दि. सिहोरा को.ऑप.राईस मिल. सिहोरा तालुका, भंडारा, साकोली तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती सालेभाटा, तालुका लाखनी, दि. पिंपळगाव सहकारी राईस मिल लिं. पिंपळगाव तालुका लाखनी, दि. जवाहर सहकारी भात गिरणी मर्या. लाखोरी,तालुका लाखनी, दि. भगिरथ सहकारी भात गिरणी लिं. मुरमाडी, तालुका लाखनी, आदर्श सहकारी राईस मिल लि.सानगडी,तालुका साकोली, श्रीराम सहकारी भात गिरणी लिं. सोकाली, श्रीराम सहकारी भात गिरणी लिं. विर्शी तालुका साकोली, विजयलक्ष्मी सहकारी राईस मिल सोसा. लिं. लाखांदुर, दि. पंचशिल सहकारी धन गिरणी मर्या. मासळ तालुका लाखांदुर, सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती वाही तालुका पवनी, सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती. कोदुर्ली, तालुका पवनी, दि. किसान सहकारी तांदुळ गिरणी मर्या. चिचाळ तालुका पवनी या २० केंद्रावर धान खरेदी करण्यात येणार आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos