चित्रपट 'अधम' सामाजिक विषयाचा आशय असलेला २८ जून ला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
मनोरंजन प्रतिनिधी / मुंबई : 
तुषार अनिल खांडगे आणि सचिन अनिल खांडगे बंधू निर्मित अधम हा तरुण पिढीला आवडणारा चित्रपट  २८ जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शन अभिषेक केळकर यांनी केले असून या चित्रपटात प्रमुख भूमिकेत संतोष जुवेकर , गौरी नलावडे, किशोर कदम, शशांक शेंडे, सुहास पळशीकर, सुहास शिरसाट, पद्मनाभ बिंड, उमेश जगताप असे अनेक कलावंतांचा सहभाग आहे. या सर्वांची अभिनयाची जुगलबंदी आपणास " अधम " मध्ये पहावयास मिळणार आहे. ह्या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद मिळेल असा विश्वास निर्माते दिग्दर्शक यांना आहे.
 या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सुधन्वा पानसे हे आहेत. मराठी मधील हि एक भव्य निर्मिती आहे. खाण माफियाचा प्रभाव, तसेच एका  शिक्षकाचे सामाजिक दायित्व, त्याचप्रमाणे एका शिक्षिकेचा त्याग, तिचे नायकावरील प्रेम, आणि आजच्या वास्तव स्थितीचे प्रभावी वर्णन, वर्तमान व्यवस्थे विरुद्ध केलेलं उद्बोधन, असे अनेक सामाजिक प्रश्न ह्यात मांडले आहेत. हे सर्वच अधम चित्रपटातून देण्याचा प्रयत्न निर्माते आणि दिग्दर्शक यांनी केला आहे. दोन मनोवृतीचा सामाजिक संघर्ष ह्यात दाखवला आहे. 
 अधम मध्ये संतोष जुवेकर यांच्या बरोबर त्याच तोडीसतोड अशी भूमिका गौरी नलावडे यांनी साकारलेली आहे. या चित्रपटाचे संगीत रोहित नागभिडे यांनी दिले असून सिनेमामधील गीते वैभव जोशी आणि वैभव देशमुख यांनी लिहिली आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण पुणे आणि आजूबाजूचा परिसर येथे करण्यात आले आहे. छायाचित्रणाची जबाबदारी धनेश पोतदार यांनी सांभाळलेली आहे, अधम चे उत्तर निर्मितीची जबाबदारी पुणे येथील वोट स्तुदिओज मध्ये करण्यात आली असून व्ही एफ एक्स चे दायित्व वोट स्तुदिओज चे जयेश प मालकापुरे  आणि टीम ने सांभाळलेली आहे. वास्तवाचे भान ठेवून जगा असा महत्वपूर्ण संदेश " अधम " ने दिलेला आहे. कुटुंबामधील सर्वच जणांनी एकत्र बसून हा सिनेमा बघावा अशी निर्मिती केली आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-06-17


Related Photos