मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण खाते


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
  राज्यातील  मंत्रिमंडळात नव्याने सामावेश झालेल्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे रोजगार हमी व फलोत्पादन खाते देण्यात आले आहे.
 आशीष शेलार यांना शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, संजय कुटे यांना कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण, सुरेश खाडे यांना सामाजिक न्याय, अनिल बोंडे यांना कृषी, अशोक उईके यांना आदिवासी विकास, तानाजी सावंत यांना जलसंधारण, राम शिंदे यांना पणन व वस्त्रोद्योग, संभाजी पाटील निलंगेकर यांना अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण ही खाती देण्यात आली आहेत. तसेच जयकुमार रावल यांना अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार, सुभाष देशमुख यांना सहकार, मदत व पुनर्वसन ही खाती देण्यात आली आहेत.
राज्यमंत्र्याच्या खातेवाटपात योगेश सागर यांना निगरविकास, अविनाश महातेकर यांना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, संजय (बाळा) भेगडे यांना कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, डॉ. परिणय फुके यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), वने, आदिवासी विकास आणि अतुल सावे यांना उद्योग आणि खनीकर्म, अल्पसंख्याक विकास व वक्फ ही खाती देण्यात आली आहेत.



  Print






News - Rajy | Posted : 2019-06-17






Related Photos