गोगाव जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार गंभीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
सायकलने दुध घेवून गडचिरोलीकडे जात असताना मागून येणाऱ्या अज्ञात स्कार्पिओ वाहनाने सायकलस्वारास धडक दिल्याने सायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज १६ जून रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास गडचिरोली - आरमोरी मार्गावरील गोगावनजिक घडली. प्रभाकर चुधरी (४५) रा. गोगाव असे गंभीर जखमी सायकलस्वाराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार गोगाव येथील प्रभाकर चुधरी हे रोजच्याप्रमाणे सकाळच्या सुमारास सायकलने दुध घेवून गडचिरोलीकडे जात होते. दरम्यान आरमोरीवरून येणाºया अज्ञात स्कार्पिओ वाहनाने त्यांच्या सायकलला मागून धडक दिली. यामध्ये प्रभाकर चुधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातामध्ये प्रभाकर चुधरी यांच्या सायकलचा चेंदामेंदा झाला. अज्ञात वाहनचालकाने अपघात घडताच घटनास्थळावरून पळ काढला.  गंभीर जखमीला तत्काळ गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-16


Related Photos