महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर तालुक्यातील ५ शाळा बंद होऊ शकतात 


- जवळपासच्या शाळांमध्ये समायोजन होणार

- शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : राज्याचा शालेय शिक्षण विभाग २० आणि २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद करून त्याऐवजी समूह शाळा निर्माण करण्याचा विचार करत आहे. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यास तालुक्यातील  ५ शाळा बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे.  गतवर्षीही कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या उद्देशाने शासनाकडून शाळांकडून माहिती मागविण्यात आली होती. त्यामुळे या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

सरकारी शाळांमधील विद्यार्थी संख्या घटत आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य व सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचा अहवाल शिक्षण विभागाने नोंदविला आहे.  राज्याचे शैक्षणिक धोरण २०२० नुसार गटातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक व शैक्षणिक वाढीसाठी गट शाळांचा विषय शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे. बल्लारपूर तालुक्यात २७ जिल्हा परिषद शाळा आहे. त्यात २० पेक्ष्या कमी पट संख्या ५ शाळा आहेत. त्यात जि. प. प्राथमिक शाळा चारवट पटसंख्या ३, जि. प. प्राथमिक शाळा केम तुकूम पट संख्या १५, जि. प. प्राथमिक शाळा बामणी काटवली पट संख्या १३, जि. प. प्राथमिक शाळा चुनाभट्टी विसापुर पट संख्या १३, जि. प. प्राथमिक शाळा कोर्टी तुकूम पट संख्या १३ आहेत. हे शाळा बंद होऊ शकतात.

या विषयी बल्लारपूर पंचायत समिती चे गट शिक्षणधिकारी शरद बोरीकर यांना विचारले असता  त्यांनी सांगितले की आता पर्यंत अशी कोणतीही माहिती मागितले नाही.





  Print






News - Chandrapur




Related Photos