ताडगव्हान येथे युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या


 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / खांबाडा :
वरोरा तालुक्यातील  शेगाव पोलीस स्टेशनच्या  हद्दीत येणाऱ्या ताडगव्हान येथील शेतकरी गजानन दादाजी भूसारी (३०)  नामक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील ताडगव्हान येथे घडली . 
गजानन भूसारी  हे भाड्याने  शेती करीत होते. शेतीच्या हंगामाची वेळ असल्याने शेती कशी करायची व बाहेरून उसणवारी घेतलेल्या कर्जाची परतफेड व पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा या विंवचेनेत त्याने आज  १६ जून रोजी  पहाटे ५ वाजताच्या सुमारास गावाशेजारील शिवारात झाडाला दोर बांधून गळफास घेतला.    त्याच्या मागे पत्नी,  एक मुलगा व मोठा आप्तपरिवार आहे.  घटनास्थळी शेगाव  पोलीसांनी पंचनामा केला व आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-16


Related Photos